नमस्कार मित्रांनो,
भटकंती बाबत बोलताना सुरुवात तर कुठून तरी करावी लागेल, मग ती मंगलमुर्ती श्री गणेशाच्या नावाने का नको?
गणपती बाप्पा.. अवघ्या महाराष्ट्राचे नव्हे तर
सबंध भारत आणि जगाचे लाडके दैवत.. विद्या आणि बुद्धीची देवता.. सुखकर्ता
आणि विघ्नहर्ता.. अनेक रूपांत आपण ज्याला दर वर्षी गणेशोत्सवात पाहतो ते
लाडके गणराय प्रत्येक गावात आणि प्रत्येक घरात आणि प्रत्येकाच्या मनामनात
बसलेले आहेत..
आपणाला अष्टविनायक हा शब्द आणि अनेकांना ते अष्ट
गणपती आणि त्यांच्याशी संबंधित आख्यायिका माहिती असतीलच.. परंतु यापलीकडेही
अशी काही ठिकाणे आहेत जिथे आपल्या लाडक्या गणरायांचे वास्तव्य आहे..
त्यातलेच एक चांदवड चे "श्री इच्छापूर्ती गणेश मंदिर".
हे मंदिर किती प्रसिद्ध किंवा पुरातन आहे हे खरच
मला माहित नाही.. पण खूप छान आहे एवढे नक्की. चांदवड ची देवी म्हटलं कि
पटकन लक्षात येते, पण लोक एवढ्या जवळ येऊनही केवळ माहित नसल्यामुळे इथे
यायचे मुकतात.. देवीच्या मंदिराच्या पुढे ( मालेगाव च्या दिशेने जाताना )
रस्त्याच्या डाव्या बाजूला थोडेसे आतमध्ये हे श्री. गणरायाचे मंदिर आहे..
मी आजवर अनेक वेळा तिथे गेलो आहे, पण पहिले दर्शन
घडवले ते आमचे परममित्र श्री. प्रविण थोरात यांनी.. त्याबद्दल त्यांचे
आभार..
खाली मी google map वरून घेतलेला नकाशा टाकत आहे,
नकाशात दिशा शिर्डी ते इच्छापूर्ती गणेश मंदिर अशी दाखवलेली आहे.. आणि
बाप्पाचा विलोभनीय फोटो पण टाकत आहे..
वेळात वेळ काढून वाचण्याची तसदी घेतलीत यासाठी तुमचे
धन्यवाद.. शक्य असेल तेव्हा एकदा तरी या सुंदर ठिकाणी नक्की जा...
आपला
दिपक नारायण पैठणकर
![]() |
शिर्डी ते चांदवड मार्ग |

Comments
Post a Comment